होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट होते अश्या वेळेस करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख कशी करावी?
मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक आणि बनावट रंगांची मोठी आवक झाली आहे.
केमिकल युक्त हे गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी ते तिथकेच घातक ही आहेत.त्यामुले खरा आणि खोटा रंग कसा ओळखावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नैसर्गिक किंवा सेंद्रिय गुलालचा वास अत्यंत सौम्य आणि फुलांसारखा असतो. जर गुलालातून पेट्रोल, रॉकेल किंवा तीव्र रासायनिक वास येत असेल, तर तो भेसळयुक्त समजावा.
थोडासा गुलाल पाण्यात टाका. जर तो पूर्णपणे विरघळला आणि तळाला काहीही उरले नाही, तर तो सुरक्षित असू शकतो. मात्र, काही कण तरंगत राहिल्यास तो वापरणे टाळा.
अस्सल गुलाल हातावर चोळल्यास तो मऊ आणि बारीक लागतो. जर तो खरखरीत किंवा त्यात चमकणारे कण दिसले, तर तो काचेची पूड असलेला असू शकतो.