'अग्गंबाई अरेच्चा' मधील ही बालकलाकार आठवतेय का?
केदार शिंदे दिग्दर्शित अग्गंबाई अरेच्चा या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली पाहायला मिळते.
मन उधाण वाऱ्याचे, उधे गं अंबे उधे, चम चम करता अशी सुरेल गाणी या चित्रपटाला लाभली होती.
तेजस्विनी पंडित हिचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते तर केदार शिंदे यांची मुलगी सना हिनेही बालकलाकार म्हणून या चित्रपटातून पदार्पण झाले.
सना व्यतिरिक्त आणखी एक बालकलाकार या सिनेमात झळकली होती.
ती म्हणजे रमा.
चित्रपटाचा नायक रंगा जिथे काम करतो तिथे ही रमा मुलगा (रामू) बनून चहा देण्याचे काम करत असते.
ही रमाची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या पाटील हिने साकारलेली आहे.
ऐश्वर्या पाटील ही आता अभिनेत्री असून ती मराठी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख बनवताना दिसत आहे.
नुकत्याच निरोप दिलेल्या माझी माणसं या सन मराठीवरील मालिकेत ऐश्वर्याने गिरीजाची भूमिका साकारली होती.
“माझा आवडता छंद…”,
‘त्या’ खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट
Check It Out