दिवाळीतील  महत्त्वाचे दिवस 

या दिवशी अनेक जन्मांच्या  कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता  वासरासहित गायीची पूजा केली जाते.

"वसुबारस" 

"नत्रयोदशी" 

या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी  यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी "धन्वंतरीची" पूजा करतात 

"यमदीपदान" 

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करून  नमस्कार करतात.  याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

"नरक चतुर्दशी" 

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ हा साजरा केला जातो.या दिवशी  दिवाळी या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. 

आपल्या घरात आलेली संपत्ती  पूजनीय असून  ती  वाढती राहो  यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते  

"लक्ष्मीपूजन

"बलिप्रतिपदा" 

भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून  घेतले तो दिवस.

 पती आणि पत्नीच्या  नात्यातील गोडवा वाढविणारा  हा दिवस मानला जातो.

 "पाडवा"

"भाऊबीज" 

भाऊ आणि बहीण यांच्या  नात्यातील पावित्र्य, आस्था जपणारा हा दिवस मानला जातो. 

"तुळशी विवाह" 

या दिवशी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते.तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.  

तुम्हाला माहित आहे का  घराबाहेर रांगोळी का काढली जाते ते?