गीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानबद्दल हि माहिती तुम्हाला माहिती आहे का ?

ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

 ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 

ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. 

ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. हे नाव त्यांनी नंतर बदलले.

एआर रहमान यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. ए आर रहमान यांना संगीताचा वारसा मिळाला आहे.

 त्यांचे वडील आरके शेखर हे मल्याळम चित्रपटांमधील गाण्यांना संगीत द्यायचे. 

ए आर रहमान यांनी मास्टर धनराज यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकले.  

ए आर रहमान यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शिष्यवृत्तीही मिळाली.  ए आर रहमान यांनी  Western classical music मध्ये डिप्लोमा केला.

ए. आर. रहमान यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं वयाची चाळीशी गाठली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती