‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी अमृता खानविलकरचा गुलाबी साडीतील लूक

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे.

साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई व झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली होती.

साईप्रसाद केरकर यांनी या सोहळ्यातील अमृताचे साडीतील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी अमृताने गुलाबी रंगाची सिल्क बनारसी साडी नेसली होती.

बनारसी साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिन्यांचा साज केला होता.

“हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

रोज तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे