कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी';  एकाच दिवशी वाढदिवस

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी वाढदिवस असतो.

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

"महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!",  असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं.

तर देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करतानाच पवारांना देखील शुभेच्छा दिल्या. "मी आपला आभारी आहे अजित दादा. आपल्याला सुद्धा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!", असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी अमृता खानविलकरचा गुलाबी साडीतील लूक