तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, संगीत उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार ग्रॅमी हा पुरस्कार एखाद्या  आध्यात्मिक नेत्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 विशेष म्हणजे, दलाई लामा यांना वयाच्या 90 व्या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

ग्रॅमी पुरस्कार जाहीर होताच, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. जगभरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.

68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. 

68 व्या ग्रॅमी सोहळ्यात दलाई लामा यांच्या मेडिटेशन : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा या अल्बमला पहिला पुरस्कार मिळाला आहे.

1 फेब्रुवारी 2026 रोजी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण?