बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे
चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता सलमान खानच्या या बर्थडेबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
२७ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेला हा अभिनेता आजही चित्रपटसृष्टीत तेवढाच सक्रिय आणि 'फिट' आहे.
गेल्या तीन दशकांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या सलमानचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक , चढ-उतारांचा राहिला आहे.
एका कार्यक्रमात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केल्यानंतर त्याला ७५ रुपये मिळाले होते.
त्यानंतर एका जाहिरातीसाठी त्याला ७५० रुपये मिळाले होते, खुद्द सलमाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सलमाननं १९८८ मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून एका साहाय्यक भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
मात्र, खऱ्या अर्थानं त्याला ओळख मिळवून दिली ती १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटानं.
या सिनेमासाठी त्याला सुरुवातीला केवळ ३१,००० रुपये मानधन मिळालं होतं, जे नंतर वाढवून ७५,००० रुपये करण्यात आलं.
काही रिपोर्ट्स नुसार सलमान खान २९०० कोटींचा मालक आहे. आज सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
सलमान खान चित्रपट, 'बिग बॉस'चं होस्टिंग, जाहिराती आणि 'बिंग ह्युमन' ब्रँडच्या माध्यमातून कमाई करतो.
अखेर ज्ञानदा रामतीर्थकरच्या खऱ्या आयुष्यातील 'पार्थ' आला समोर...
Check It Out