कोरिओग्राफर फराह खानचा आज वाढदिवस आहे. तिने इंडस्ट्रीत सक्रिय होण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे.
बॉलीवूड डायरेक्टर आणि कोरिओग्राफर फराह आज ९ जानेवारी रोजी तिचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
फराह खानचे वडील कामरान खान हे मुस्लिम होते तर तिची आई मनेका इराणी या पारशी होत्या.
विशेष म्हणजे फराह खानच्या वडीलांनी स्टंटमॅन बनून करिअरची सुरुवात केलेली. मग हळूहळू प्रगती करत ते सिनेनिर्माते बनले होते.
फराह खानवर मायकल जॅक्सनचा खूप प्रभाव होता. या कारणास्तव तिने आपले करिअर म्हणून नृत्याची निवड केली.
फराह डान्स शिकली आणि तिने स्वतःचा डान्स ग्रुपही बनवला. पण यासर्वात तिचा मार्ग खूप कठीण होता.
फराह खानला चित्रपटसृष्टीत या पदावर नेण्यात ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांचा मोठा वाटा आहे.
सरोज खान यांनी १९९२ मध्ये आमिर खानचा जीता वही सिंकदर हा सिनेमा मध्येच अर्धवट सोडला. त्यानंतर फराह खानला हा चित्रपट मिळाला. फराह खानने अनेक गाणी कोरिओग्राफ केली.
त्यानंतर फरहाने तिच्याहून ९ वर्ष लहान शिरीष कुंदरशी लग्न केले आणि फराह खानला आता तिळी मुलं आहेत
फराह खान कोरिओग्राफर तर आहेच पण आता ती उत्तम दिग्दर्शिका म्हणून सुद्धा नावारुपाला आली आहे.
फराह खानने ओम शांती ओम, मै हू ना, कुछ कुछ होता है , हॅप्पी न्यू इयर यांसारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.
गीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानबद्दल हि माहिती तुम्हाला माहिती आहे का ?