उन्हाळ्यात कडाक्याच्या तापमानापासून वाचण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.

भरपूर पाणी, नारळ पाणी, कलिंगड आणि काकडीचा आहारात समावेश करा.

सुती व सैल कपडे वापरा, दुपारी बाहेर जाणे टाळा आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी लिंबू पाणी, ताक प्या. आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. 

दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या, तहान नसली तरी पाणी पित राहा.

कलिंगड, काकडी, टरबूज आणि संत्री यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.

लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी आणि कैरीचे पन्हे शरीराला थंडावा देतात.यांचे सेवन जास्त करा 

बाहेर जाताना सुती, फिकट रंगाचे आणि सैल कपडे वापरा.

उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ, चहा, कॉफी आणि साखरेचे पेये कमी करा.

बाहेर पडताना सनस्क्रीन वापरा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा.

शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा.

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड (थंड) ठेवण्यासाठी खालील फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे