वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात अभिषेक सोहळ्याचा उत्साह

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे आषाढी वारीला महाराष्ट्रात खूप महत्व आहे.

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठुनामाचा गजर होत आहे.

मुंबईतील वडाळा येथे असणाऱ्या विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.

आषाढी एकदाशीनिमित्त आज वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात अभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.

विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.

पहाटेपासून लोकांनी  विठ्ठल-रुक्मिनीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत.

पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री शिंदेंनी केली महापूजा तर उपमुख्यमंत्री फडणवीस वारकऱ्यांसह दिसले!