आषाढी एकादशीचा उपवास करताय?  मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

१७ जुलै (बुधवारी) रोजी आषाढी एकादशी आहे.

 उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधने पाळणे, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश.

उपवासाच्या पदार्थांमध्येही कॅलरी वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा अनारोग्यदायी ठरु शकतो.

ताक, दूध, शहाळे पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

फक्त बटाटा खाण्यापेक्षा खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा पदार्थ उपवासाला आवर्जून खा.

साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो.

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करत असेल तर त्याने आवर्जून फळ खायला हवी.

फळातील साखरेमुळे शरीराला उर्जा मिळते.  फळं पचायलाही सोप्पी असतात.

मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे पदार्थ खाणे टाळावे.

 गुलाबी लेहेंगा, केसात कमळाची फुलं अन्…;  राधिका मर्चंट झाली ‘मिसेस अंबानी