अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात दीपिका पदुकोणचा लूक पाहिलात का ?

दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या लग्नसोहळ्यातील तिचे फोटो शेअर केले आहेत.

दीपिकाने या सोहळ्यासाठी खास लाल रंगाची अनारकली परिधान केली आहे.

दीपिकाने स्वत:च बेबी बंप ओढणीने झाकून घेतल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.

गळ्यात चोकर नेकलेस, स्लीक बन आणि त्यावर गजरा, लाल रंगाची बिंदी असा लूक दीपिकाने केला आहे.

लवकरच आई होणाऱ्या मस्तानीच्याच्या चेहऱ्यावर प्रग्नेन्सीचा ग्लो आलेला दिसतोय.

अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यात दीपिकाच्या पतीने म्हणजेच रणवीर सिंगनेदेखील हजेरी लावली आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात दीपिका पदुकोणचा लूक पाहिलात का ?