निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण तुम्हाला या मागील कारण माहित आहे का ?

तुम्ही मतदान केलं आहे, याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई.

यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे, हे सुनिश्चित केलं जातं. म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यांदा मत देऊ शकत नाही.

कारण ही शाई अशी असते, जिचा डाग लगेचच पुसता येत नाही. सुरूवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते.

ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते.

ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशांतही मतदानानंतर शाईने खूण करणं बंधनकारक आहे.

विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाई भारतातूनच जाते.

चला तर जाणून घेऊया मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खाण्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन...