लग्नाच्या १३ दिवसानंतर सोनाक्षी लाडक्या आईसाठी खास पोस्ट
२३ जून २०२४ रोजी बॉलीवूडची ‘दबंग गर्ल’ अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकली.
तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या साक्षीने नोंदणी पद्धतीने लग्न केले.
लग्न होऊन १३ दिवसांनी सोनाक्षीने लाडक्या आईबाबांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
“जेव्हा आईला जाणवलं की, मी आता घर सोडून जाणार, तेव्हा तिला रडू आलं. मी तिला सांगितलं, आई काळजी करू नको, जुहू ते वांद्रे केवळ २५ मिनिट दूर आहे.”
“आज तिची जरा जास्तच आठवण येतं आहे. म्हणून मी स्वतःलादेखील हेच समजावत आहे. मी लवकरच भेटेन.”
सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आईला मिठी मारून रडताना दिसत असून दोघींच्या मागे शत्रुघ्न सिन्हा उभे आहेत.
दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांच्या खांद्यावर डोकं टेकवून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तिसऱ्या फोटोमध्ये मायलेकी हसताना दिसत आहेत. तर चौथ्या फोटोमध्ये लग्नानंतर आई-बाबांना मिठी मारताना सोनाक्षी पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात चिकटपणा टाळण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी