अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध होस्ट गौरव कपूर अडकले विवाहबंधनात
11 मार्चच्या संध्याकाळी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी दोघांनी एका खाजगी समारंभात नोंदणीकृत विवाह केला.
कृतिका आणि गौरवने मोठ्या थाटामाटाच्या आणि पारंपरिक लग्नाऐवजी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या समारंभात केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.
लग्नाच्या निमित्ताने कृतिका कामरा लाल रंगाच्या चंदेरी साडीत खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे, ही साडी तिला तिच्या आईने भेट दिली होती.
तर, गौरव कपूरने डिझायनर राघवेंद्र राठोड यांचा आयव्हरी आणि गोल्ड रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता