कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव! त्या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो.
दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या मसाला दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग त्या दूधाचे सेवन करावे .
थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
या दिवशी चंद्र त्याच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्याच्या किरणांनी अमृताचा वर्षाव होतो.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असतो. त्याचमुळे या रात्री चंद्राचा शांत शीतल प्रकाश जणू अमृतवर्षाव करतोय असाच भास होतो.
या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते.
रात्रीच्या शांततेत चंद्राच्या शितल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही रात्र साजरी केली जाते.