spot_img

Voting ink : “निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय” निवडणूक आयोगाने काय दिलं उत्तर?

spot_img

महापालिका निवडणुकीसाठी सगळीकडे मतदान सुरू आहे. पण, पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर शाई दाखवण्याचा ट्रेंड होता पण आता बोटाची शाई पुसली जात असल्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मुंबई (Mumbai) मध्ये बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे बंधूंनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. अखेरीस निवडणूक आयोगालाही जाग आली असून शाई पुसली जात असल्याबद्दल खुलासा केला आहे. मार्कर पेन वापरले असल्याचं मान्य केलं आहे. या पुढे झेडपीच्या निवडणुकीत वापरणार नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला. पण, अजून कोणतीही कारवाई किंवा शाई बदलाबद्दल कोणतंही पाऊल उचललं नाही.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि बोटावर शाई पुसण्याचा प्रकार आणि दुबार मतदारावर भाष्य केलं. “कोरस कंपनीचे मार्क वापरतोय. २०११ पासून मार्कर वापरले जात आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक ही १० वर्षांनंतर होत आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीत काय पद्धत आहे. अनेक ठिकाणी ४ वार्डमधून उमेदवार निवडून द्यायचे आहे. या मध्ये सुद्धा संभ्रम आहे. यासाठी आम्ही एक अॅनिमेशन व्हिडीओ तयार केला आहे. मतदारांना किती मत द्यायचं, कोणत्या मतप्रक्रियेचा कलर वेगळा आहे. काही मतदारांनी पाहिलं आहे त्यांचा गोंधळ उडाला आहे” अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ