spot_img

Vivek Sangle Instagram Account Deleted By Meta : लोकप्रिय अभिनेता विवेक सांगळेला इन्स्टाग्रामचा ‘दे धक्का’! लाखो फॉलोअर्स असलेले व्हेरिफाईड अकाउंट रातोरात गायब

spot_img

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ लढाईनंतरही ‘मेटा’कडून प्रतिसाद नाही; शून्यातून नवी सुरुवात करण्याचा अभिनेत्याचा निर्धार

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विवेक सांगळे सध्या एका मोठ्या डिजिटल संकटाचा सामना करत आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी, इन्स्टाग्रामने कोणतीही पूर्वसूचना न देता विवेकचे व्हेरिफाईड अकाउंट अचानक कायमचे बंद (Delete) केले. या अकाउंटवर त्याचे १.४२ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते आणि त्याच्या काही व्हिडिओंना तर ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून विवेकने हे अकाउंट परत मिळवण्यासाठी मुंबईतील बीकेसी येथील ‘मेटा’ टीमपासून ते अमेरिकेतील मुख्य कार्यालयापर्यंत शेकडो ईमेल आणि विनंत्या केल्या, मात्र प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून कलाकारांसाठी ब्रँड प्रमोशन आणि रोजगाराचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. विवेकने अत्यंत भावूक होत एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली की, त्याच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर एका रात्रीत पाणी फेरले गेले आहे. इन्स्टाग्रामने त्याच्या कोणत्याही अपीलाला दाद न दिल्याने, अखेर त्याने हार न मानता शून्यातून नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आता एक नवीन इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले असून, जुन्या चाहत्यांना पुन्हा एकदा सोबत येण्याचे आवाहन केले आहे.

एका बाजूला डिजिटल क्रांती होत असताना, दुसरीकडे नामांकित कलाकारांची सुरक्षित आणि व्हेरिफाईड खातीही अशा प्रकारे तांत्रिक कचाट्यात सापडत असल्याने चित्रपट सृष्टीत चिंतेचे वातावरण आहे. विवेकच्या या धाडसी निर्णयाचे त्याचे सहकलाकार आणि चाहते कौतुक करत असून, त्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ