spot_img

Vishal Thakkar : बॉलिवूडमधील मधील ‘हा’ अभिनेता गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता,गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू

spot_img

वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस !

बॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकण्यासाठी अनेक लहान- मोठे कलाकार आपले नशीब आजमावतात. त्यानंतर त्यांना एखादा रोल मिळतो. मात्र असे काही कलाकार आहेत जे सुरुवातीला गाजले आणि तर अचानक गायब झाले. बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता विशाल ठक्कर हे त्यातीलच एक नाव आहे. संजय दत्तचा २००३ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’तो अखेरचा दिसला.गेली १० वर्ष हा अभिनेता गायब आहे? सध्या तो कुठे आहे? याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.

अभिनेता विशाल ठक्करने (Vishal Thakkar) ‘चांदनी बार’ या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याचं नशीब फळफळलं. चांदनी बार नंतर त्याला थेट संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्याचं काम अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं.त्याचबरोबर विशाल टीव्ही मालिका’टँगो चार्ली’,’क्यूंकी सास भी कभी बहू थी’ तसेच ‘किस देश में है मेरा दिल’सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. मात्र,प्रेयसीने विशालवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याचं करिअर पूर्णपणे संपुष्टात आलं . बेपत्ता होण्यापूर्वी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता.मात्र, त्यानंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती.

एके दिवशी विशाल ठक्करने त्याच्या आईकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला.त्यानंतर एका पार्टीसाठी जात असल्याचा मेसेज त्याने घरच्यांना केला. मात्र त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही.विशालचा कोणताही पत्ता लागला नाही आणि दोन वर्षांनंतर त्याची प्रेयसीही तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

विशाल ठक्कर त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्याची गर्लफ्रेंड खूपच रागीट होती. त्यांच्यात सतत भांडणे होत असत. एकदा, वाद इतका टोकाला गेला की गर्लफ्रेंडने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी विशालला अटक केली, नंतर तक्रार मागे घेण्यात आली होती तरी या घटनेने विशालला धक्का बसला. या घटनेमुळे आपली प्रतिमा मलिन झाली आहे असा समज करुन तो हळूहळू नैराश्यात गेला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ