spot_img

Visakha Subedar Son Stuck In Kuwait : कुवेतमध्ये अडकलेल्या मुलासाठी विशाखा सुभेदारची सरकारकडे मदतीची हाक

spot_img

इराण-इस्रायल तणावामुळे प्रवाशांवर परिणाम; अभिनेत्रीने चार दिवसांपासून अडकलेल्या मुलासाठी केली विनंती .

मध्यपूर्वेतील तणाव आणि इस्रायल (Israel) आणि अमेरिकेकडून (America) यांच्या इराण विरोधातील संयुक्त हल्ल्यानंतर जगभरातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम झाला आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती देशांतील अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीत आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या परिस्थितीत, मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला असून, त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तिने केंद्रीय आणि राज्य सरकारकडे मदत मागितली आहे. विशाखा यांनी सोशल मीडियावर रडत व्हिडीओ शेअर केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केले.

व्हिडीओमध्ये विशाखा सुभेदार म्हणाल्या की, “माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये फ्लाईटमध्ये उतरवण्यात आला. चार दिवसांपासून तिथे अडकला आहे. तिथली परिस्थिती गंभीर झाली आहे, ड्रोन हल्ल्यांचा धोका आहे. कृपया भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करतोय.”

सध्या विशाखा सुभेदारच्या या आवाहनामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरही तातडीच्या उपाययोजना सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ