37 वर्षांच्या स्टार क्रिकेटपटूच्या नावावर आहेत इतके रेकॉर्डस !
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा 37 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याने क्रिकेट जगतात अनेक विराट रेकॉर्डस तयार केले आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.भारतीय क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडूंमध्ये ‘विराट कोहली’ हे एक नाव सर्वांच्या तोंडी आहे. विराटने 20 ऑगस्ट 2008 रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केवळ चार वर्षांच्या आत तो भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला.थोड्याच काळात तो जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक बनला. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक सामने जिंकले.जरी त्याच्या कर्णधारपदात भारताने ICC ट्रॉफी जिंकली नाही, तरी त्याने अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.
कोहलीचे टॉप 10 रेकॉर्ड्स –
सर्वाधिक एकदिवसीय शतके (कोहलीचे 51 शतके, महान सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे).
10,000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरी – एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वोत्तम सरासरीचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.
सर्वाधिक द्विशतके (भारतीय फलंदाज) – कसोटी क्रिकेटमध्ये सात द्विशतके करणारा तो भारतातील एकमेव फलंदाज आहे.
एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा – कोहलीच्या नावावर एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा (973) करण्याचा विक्रम आहे, जो त्याने 2016 मध्ये केला होता.
सर्वाधिक आयसीसी टेस्ट रेटिंग प्वाइंट्स मिळवणार भारतीय – आयसीसी कसोटी क्रमवारीत 937 रेटिंग गुणांसह कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
परदेशात सर्वाधिक शतके: कोहलीने 2014 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चार शतके ठोकली. नंतर शुभमन गिलने 2025 च्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये या विक्रमाची बरोबरी केली.
कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकणे – कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आणि रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सर्वाधिक 10,000 धावा – कोहलीने त्याच्या 205 व्या डावात एकदिवसीय सामन्यात 10,000 धावा पूर्ण केल्या, ज्यामुळे तो इतिहासातील सर्वात जलद हा माईलस्टोन गाठणारा फलंदाज ठरला.
सर्वाधिक २७ हजार आंतरराष्ट्रीय धावा – त्याने 594 डावांमध्ये तिन्ही स्वरूपात 27,000 धावांचा आकडा पूर्ण केला.
भारताचा सर्वात यशस्वी परदेशातील कर्णधार – कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये भारताला संस्मरणीय मालिका विजय मिळवून दिला. भारताने केवळ ऑस्ट्रेलियामध्येच नव्हे तर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतही यश मिळवले.




