spot_img

Virat Kohli : न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे सीरिजच्या आधी विराट कोहलीसह टीम इंडियातील खेळाडूंनी घेतले महाकालचे दर्शन

spot_img

भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्याची वन डे सीरिज सुरू आहे. ही सीरिज आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. न्यूझीलंड आणि भारताने प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. शेवटच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. इंदूरच्या मैदानात रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, नेहमी अनुष्का शर्मासोबत दिसणारा विराट कोहली (Virat Kohli) यावेळी टीम इंडियाच्या एका ‘खास’ व्यक्तीसोबत भस्म आरतीला उपस्थित होता.

केवळ विराटच नाही, तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही महाकालाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत केएल राहुल आणि संघातील इतर सदस्यांनीही बाबा महाकालाचा आशीर्वाद घेतला. मालिकेचा शेवटचा सामना इंदूरमध्ये असल्याने खेळाडूंनी शेजारीच असलेल्या उज्जैनला भेट देण्याची संधी सोडली नाही. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कुलदीप यादव भावूक झाला होता. तो म्हणाला, “महाकालाच्या दर्शनाने खूप शांतता मिळाली. संपूर्ण टीम इथे आली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नक्कीच दमदार कामगिरी करेल.” रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलताना तो म्हणाला की, हे दोन्ही क्रिकेटचे दिग्गज आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संघात एक वेगळीच ऊर्जा मिळते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ