spot_img

Virat Kohli Instagram Account Reactivated : विराट कोहली अचानक सोशल मीडियावरून गायब! चाहत्यांमध्ये खळबळ, काही तासांतच अकाउंट पुन्हा सक्रिय

spot_img

इन्स्टाग्रामवर ‘User not found’ दिसल्यानं चर्चांना उधाण; कोहलीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे शुक्रवारी चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. विराटचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक दिसेनासं झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा भडका उडाला. अनेक चाहत्यांनी विराट कोहली नावाने इन्स्टाग्रामवर शोध घेतला असता, ‘User not found’ असा संदेश दिसत होता.

या घटनेनंतर चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले. विराटने स्वतःहून अकाउंट डिलीट केलं आहे का? की ते हॅक किंवा सस्पेंड झालं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर तब्बल 27 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्टारचं अकाउंट अचानक गायब होणं साहजिकच चर्चेचा विषय ठरलं.

अनेक चाहत्यांनी थेट विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सखाली कमेंट करत ‘विराट कुठे आहे?’ असा सवालही उपस्थित केला. काही तासांनंतर मात्र विराटचं इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झालं आणि त्याच्या पोस्ट्स पुन्हा दिसू लागल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मात्र, या संपूर्ण प्रकरणावर विराट कोहली किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे अकाउंट तांत्रिक कारणांमुळे निष्क्रिय झालं होतं की हा विराटचा वैयक्तिक निर्णय होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, या चर्चांना आणखी हवा मिळाली कारण शुक्रवारी सकाळी विराटचा भाऊ विकास कोहली याचंही इन्स्टाग्राम प्रोफाइल ‘Profile isn’t available’ असं दाखवत होतं. त्यामुळे चाहत्यांच्या शंका अधिकच वाढल्या.

विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर अकाउंट गायब असतानाही विराट कोहली ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर 37 वर्षीय विराट कोहली अलीकडेच लंडनला परतला आहे. आगामी आयपीएल 2026 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळताना दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ