spot_img

Vikram Bhatt Arrested : बॉलिवूडच्या दिग्दर्शकाचा मोठा कारणामा, पत्नीसह झाली अटक

spot_img

दिग्दर्शकाने 200 कोटींचं अमिष दाखवून 30 कोटींवर डल्ला;

बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Director) विक्रम भट (Vikram Bhatt) आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. विक्रम भट्ट यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चित्रपटांच्या नावाखाली राजस्थानमध्ये एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

राजस्थान पोलिसांनी रविवारी मुंबईत प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक केली. उदयपूर येथील उद्योजक आणि भारतीय इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुरडिया यांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांच्या पथकानं विक्रम भट्ट यांना मुंबईतील यारी रोडवरील गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक केली आहे. जिथून विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केली, ते त्यांच्या मेहुणीचं घर असल्याचं सांगितलं जातंय. आता त्यांना उदयपूरला नेण्यासाठी पोलीस वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांड अर्ज दाखल करणार आहेत.

याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट आणि इतर सहा ते सात जणांच्या विरोधात 20 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केले होते. याच फसवणुकी प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या एक टीमनं मुंबईच्या वर्सोवा पोलिसांचा मदतीनं विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला यारी रोड परिसरातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी हॉलिडे कोर्टात त्यांच्या ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील चौकशीसाठी राजस्थानला घेऊन निघाले आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे बॉलिवूड हादरलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ