spot_img

Vicky Kaushal and Katrina Kaif Baby Name : कतरिना आणि विक्की ने लेकाचं नाव सांगितलं,खास पोस्ट केली शेयर

spot_img

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिनानं चाहत्यांसोबत क्युट सरप्राईज शेअर केलं आहे. दोघांनी आपल्या मुलाची पहिली झलक शेअर करुन त्याचं नावंही चाहत्यांना सांगितलंय. कतरिनानं विक्कीच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेत मुलाचं नाव ठेवलं आहे. याचं ‘धुरंधर’ फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी संबंधित आहे. खरं तर, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी सोशल मीडियावर एक क्युट फोटो शेअर केला आहे, तसेच, पोस्टमध्ये आपल्या मुलाचं नाव शेअर केलं आहे.

कतरिना आणि विक्की यांनी फोटो पोस्ट करताना लिहिलंय की, “आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा पहिला किरण, विहान कौशल. प्रार्थनांचे उत्तर मिळतं, जीवन सुंदर आहे, आपलं जग एका क्षणात बदलतं…” कतरिना आणि विक्कीच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करुन विहानवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तुम्हाला माहितीय का? कतरिना आणि विक्कीनं मुलाचं ठेवलेलं नाव, विक्की कौशलचा सर्वात मोठ्या हिट सिनेमा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’शी जोडलेलं आहे?”

7 नोव्हेंबर 2025 हा दिवस कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवस होता. या दिवशी कतरिना आई बनली. आता, या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. कतरिनाने विक्कीच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेतली, जो धुरंधर दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी जोडलेला आहे. खरं तर, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी सोशल मीडियावर एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि विक्की त्यांच्या मुलाचे लहान हात धरलेले दिसतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ