spot_img

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार क्रसुला रोप ठेवण्याचे फायदे आणि योग्य पद्धत

spot_img

वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते, कारण हा नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवतो. हिरवागार पानं आणि हृदयाकृती रचनेमुळे मनी प्लांट प्रेम, सौहार्द आणि शांततेचे प्रतीक आहे. तसेच हा प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवतो आणि आर्थिक समृद्धीसाठीही लाभदायक ठरतो.

मात्र, फेंगशुई आणि आधुनिक वास्तुशास्त्रानुसार क्रसुला प्लांट हे मनी प्लांटपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. हे रोप घरात ठेवल्यास आर्थिक चणचण कमी होते, उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. व्यवसाय आणि नोकरीसाठीही क्रसुला फायदेशीर आहे.

क्रसुला प्लांट ठेवताना घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला स्थान देणे शुभ ठरते. झाडाला जास्त पाणी देण्याची गरज नसते, फक्त पानं स्वच्छ ठेवावी आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा. वास्तुशास्त्रानुसार क्रसुला रोप घरातील उर्जा संतुलित ठेवते, वातावरण शुद्ध करते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करते.

एकंदरीत, क्रसुला प्लांट मनी प्लांटसारखा शुभ आहे, पण आर्थिक समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तो अधिक प्रभावी मानला जातो. घरात योग्य दिशेला ठेवून ह्या रोपाचा फायदा मिळवता येतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ