spot_img

Vanshika Chadha Meet Kuldeep Yadav wife : मसुरीच्या डोंगररांगांत रंगणार कुलदीप यादवचा शाही विवाहसोहळा! पण होणारी पत्नी नक्की आहे तरी कोण?

spot_img

बालमैत्रीण वंशिका चड्ढासोबत आज घेणार सप्तपदी; ‘हॉटेल सॅवॉय’मध्ये क्रिकेट विश्वाचा मोठा राबता

भारतीय क्रिकेट संघाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव आज आपल्या आयुष्यातील एका नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. टी-२० विश्वचषक विजयानंतर कुलदीपच्या आयुष्यात आनंदाचा आणखी एक मोठा क्षण आला असून, तो आज (१४ मार्च) आपली बालमैत्रीण वंशिका चड्ढा हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. उत्तराखंडमधील निसर्गरम्य मसुरी येथे हा शाही सोहळा पार पडत आहे. गेल्या वर्षी ४ जून २०२५ रोजी या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि आता लहाणपणाच्या या मैत्रीचे रूपांतर कायमच्या नात्यात होणार आहे.

कोण आहे कुलदीपची ‘बेटर हाफ’?

लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करणारी कुलदीपची होणारी पत्नी वंशिका चड्ढा ही उच्चशिक्षित असून तिने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या प्रतिष्ठित संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. कुलदीप क्रिकेटच्या मैदानात आपली जादू दाखवत असताना, वंशिकाने मात्र आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवण्यावर भर दिला आहे.

मसुरीच्या ऐतिहासिक हॉटेलमध्ये रंगणार सोहळा

कुलदीप आणि वंशिकाच्या लग्नाचे विधी १३ मार्चपासूनच सुरू झाले असून, हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमात कुटुंबियांनी मोठी धमाल केली. आजचा मुख्य विवाहसोहळा मसुरीतील ऐतिहासिक ‘हॉटेल सॅवॉय’ मध्ये पार पडणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह बीसीसीआयचे अनेक दिग्गज अधिकारी आणि क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. डोंगररांगांच्या साक्षीने पार पडणाऱ्या या लग्नामुळे मसुरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ