spot_img

Vaibhav Suryavanshi News : 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडला फायनलमध्ये दिला झटका

spot_img

भारताच्या क्रिकेट इतिहासात आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्व थक्क केलं आहे. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध वैभवने अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली.

इंग्लंडच्या गोलंदाजांवर वैभवने केलेला हल्ला इतका जबरदस्त होता की, मैदानासोबतच सोशल मीडियावरही खळबळ उडाली. या खेळीवर प्रतिक्रिया देताना ‘क्रिकेट इन आयसलँड’ या प्रसिद्ध सोशल मीडिया हँडलने एक्स (ट्विटर) वर एक मिश्किल पोस्ट शेअर केली. “वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा! इंग्लिश गोलंदाजांवर सुरू असलेला हा हल्ला X-rated आहे,” असं त्यांनी लिहिलं आणि ही पोस्ट काही वेळातच प्रचंड व्हायरल झाली.

वैभवची ही खेळी केवळ सामन्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने इतिहास रचला. आयसीसीच्या कोणत्याही अंतिम सामन्यात (पुरुष, महिला किंवा कोणत्याही वयोगटात) केलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडकडे होता. त्यांनी 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये 174 धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे, स्पर्धेच्या सुरुवातीला वैभवचा प्रवास काहीसा अडखळलेला होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो केवळ 2 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने तीन अर्धशतके आणि काही उपयुक्त खेळी केल्या, मात्र शतक गाठता आलं नव्हतं. पण अंतिम सामन्यात त्याने सर्व मर्यादा मोडीत काढत आपली खरी झलक दाखवली.

फायनलमध्ये वैभव दुहेरी शतकाच्या दिशेने झेपावत होता. मात्र स्लोअर बॉलवर विकेटकीपरकडे झेल देत त्याची झंझावाती खेळी थांबली. तरीही त्याने खेळलेली ही ऐतिहासिक इनिंग भारताच्या क्रिकेट इतिहासात कायम लक्षात राहील, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ