spot_img

Vaibhav Sooryavanshi In Pranit More Show : भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू पोहोचला प्रणित मोरेच्या ‘शो’ मध्ये!

spot_img

वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) पाकिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी करून टीम इंडियाला विजय मिळून दिला होता. अशातच आता वैभव सूर्यवंशी आजच्या मॅचपूर्वी एका शोमध्ये पोहोचला. महाराष्ट्राचा प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस फ्रेम प्रणित मोरे याचा अमरावतीमध्ये शो लागला होता. त्या शोआधी वैभव सूर्यवंशीने प्रणित मोरेला फोन केला अन् भैया मी तुमच्या शोमध्ये येऊ का? असा सवाल केला. त्यावर वैभवने एक अट देखील ठेवली. भैया तू माझी मस्करी करणार नसशील तरच मी येईल, असं वैभव म्हणाला. त्यावर प्रणित मोरेने पाकिस्तानची शाळा घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशी आता त्याची खरी परीक्षा देणार आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूरचा हा मुलगा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेला बसणार आहे. सीबीएसई बोर्डाने वैभव सूर्यवंशीचे प्रवेशपत्र जारी केले आहे. वैभवसाठी ही अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे परीक्षेच्या आधी वैभव सूर्यवंशीने मन हलकं होण्यासाठी कॉमेडी शोमध्ये हजेरी लावणं पसंत केलं. दरम्यान, क्रिकेट आणि शिक्षण संतुलित करणं हे वैभव सूर्यवंशीसाठी एक मोठं आव्हान असेल, कारण 26 मार्चपासून आयपीएल सामने देखील सुरू होणार आहेत. वैभव सूर्यवंशीने परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ