अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर युद्धविरोधी जनआंदोलन सुरू झाले असून, नागरिकांनी इराणविरोधातील युद्ध आणि सरकारांच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेत तब्बल लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि इराणसोबतचे युद्ध तात्काळ थांबवण्याची तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठवला.
न्यूयॉर्क सिटीसहन्यू यॉर्क सिटी मिडटाऊन मॅनहॅटन मोठे मोठे मोठे मोर्चे काढण्यात आले. तसेच सॅन फ्रान्सिस्को आणि इतर अनेक शहरांमध्येही लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाढती महागाई, इमिग्रेशन धोरणे आणि परराष्ट्र धोरणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचे दिसून आले.
आंदोलनकर्त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी आणि घोषणांच्या माध्यमातून आपला विरोध व्यक्त केला. अनेक ठिकाणी “नो वॉर” आणि “ट्रम्प यांना हटवा” अशा घोषणा देण्यात आल्या. काही ठिकाणी प्रसिद्ध कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दुसरीकडे, इस्त्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन झाले. तेल अवीव येथे लाखो नागरिक उतरले आणि बेंजामिन नेतान्याहू
यांच्या विरोधात निदर्शने केली. इराणविरोधातील युद्ध थांबवावे आणि देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
सततच्या युद्धामुळे आर्थिक ताण वाढत असून, सामान्य नागरिकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकेसह इस्त्रायलमध्येही “नो वॉर”चा आवाज अधिक तीव्र होत असून, राजकीय नेतृत्वाविरोधातील जनसंताप स्पष्टपणे दिसून येत आहे.




