spot_img

Urvashi Rautela : उर्वशीचा रौतेलाचा ‘बोल्ड’ अवतार! ब्लाऊजशिवाय नेसली बनारसी साडी; पाठीवर रुळणाऱ्या हिऱ्याच्या हाराने वेधले लक्ष

spot_img

बॉलिवूडच्या ‘फॅशन क्वीन’चा नवा प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल; पारंपरिक लूकला दिला हॉट आणि रॉयल टच

बॉलिवूडमधील सर्वात महागडी आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला पुन्हा एकदा आपल्या अनोख्या फॅशनमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. नेहमीच आपल्या आलिशान जीवनशैलीने चाहत्यांना थक्क करणाऱ्या उर्वशीने यावेळी चक्क ब्लाऊजशिवाय साडी नेसून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती निळ्या रंगाची अत्यंत सुंदर बनारसी सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. या ‘नो-ब्लाऊज’ लूकमध्ये तिने आपली टोन्ड बॅक अत्यंत आत्मविश्वासाने फ्लॉन्ट केली असून, साडी नेसण्याच्या तिच्या या धाडसी शैलीने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत.

या लूकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिने परिधान केलेले दागिने. उर्वशीने गळ्यात घालण्याऐवजी मौल्यवान माणिक आणि हिऱ्यांचा हार आपल्या पाठीवर माळला आहे, जो तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहे. सोन्याच्या जरीचे काम असलेल्या साडीसोबत तिने केसांचा उंच ‘हाय बन’ बांधून त्यावर पांढरी फुले माळली आहेत, ज्यामुळे तिला एक ‘विंटेज’ आणि ‘रॉयल’ लूक मिळाला आहे. न्यूड मेकअप आणि विंग्ड आयलाइनरसह तिने हा लूक पूर्ण केला असून, तिच्या या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कधी महागड्या गाऊनमुळे तर कधी कोट्यवधींच्या दागिन्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्वशीने या साडी फोटोशूटमधून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती खऱ्या अर्थाने बॉलिवूडची ‘स्टाईल आयकॉन’ आहे. साडीसारख्या पारंपरिक पोशाखाला इतक्या आधुनिक आणि बोल्ड पद्धतीने मांडण्याची तिची ही कला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ