spot_img

Unmesh Patil : उन्मेष पाटीलांचा शिंदे सेनेकडे मोर्चा; ठाकरे गटाला मोठा धक्का!

spot_img

६ मार्चला मुंबईत शक्तीप्रदर्शनासह अधिकृत प्रवेश; जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून माजी खासदार उन्मेष पाटीलां यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ मार्च रोजी मुंबई येथे खासदार Shrikant Shinde यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या प्रवेशावेळी शक्तीप्रदर्शनही होणार असल्याची माहिती आहे.

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यापासून अनेक आमदार व पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले होते. मात्र कोणतीही निवडणूक नसताना पाटील यांचा हा निर्णय घेतला जाणे विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेकडून थकीत कर्जप्रकरणी त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतरच त्यांनी राजकीय भूमिका बदलल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा प्रवेश दबावाखाली तर नाही ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पाटील हे २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले होते. मात्र २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मध्ये प्रवेश केला. त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांची राजकीय सक्रियता काहीशी कमी झाल्याचे दिसून आले.

गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केल्याचे समजते. आता त्यांच्या अधिकृत प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांची भूमिका काय असेल, तसेच भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उन्मेष पाटील यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे सेनेची ताकद जिल्ह्यात वाढणार की नव्या गटबाजीला सुरुवात होणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ