spot_img

Uddhav Thackeray : मुंबई महापौरपदासाठी उद्धव ठाकरेंचं देवाकडे गाऱ्हाणं!

spot_img

मालवणी महोत्सवातून भावनिक आवाहन; २०१२ च्या यशाची आठवण देत कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न

मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ४ किंवा ५ नोव्हेंबरला निवडणूक घोषणेची शक्यता असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालाडमधील मालवणी महोत्सवात कार्यकर्त्यांना एकत्र करत भावुक संदेश दिला. २०१२ सालच्या यशस्वी आठवणींना उजाळा देत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर मुंबईला मिळावा, यासाठी ईश्वराची प्रार्थना केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मागाठाणे भागातील जुनी स्मृती जागवली. “२०१२ मध्ये याच ठिकाणी मी देवाकडे गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा. त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साही केले. “आता पुन्हा तसंच प्रार्थना केली आहे, पुढचं काय होतं ते सांगत नाही,” असे खेळीमेळीने म्हणत त्यांनी उपस्थितांना हसवलेही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा उल्लेख करत उद्धव म्हणाले, “अजूनही काही आपली माणसं धडपडतायत.

संघर्ष आला की मराठी माणूस मागे हटत नाही, शिंगावर घेऊन लढतो. ही जिद्द वेतोबाने आपल्याला दिलेली आहे.” सांस्कृतिक कार्यक्रम असलेल्या मालवणी महोत्सवाला उद्धवांच्या हजेरीमुळे राजकीय सभेचे रूप आले. त्यांनी कार्यकर्त्यांना केवळ उत्साह न ठेवता सतर्क राहण्याचा सल्ला दिला. “आपला मोर्चा झालाय, आता सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. अन्यथा मुंबईत जे दिसतंय, ते पुढील पाच वर्षांत दिसणारही नाही,” असा इशारा देत त्यांनी राजकीय परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली.”देव आपलं ऐकतो, मी मनापासून बोलतो,” असे ठामपणे सांगत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि एकजूट निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे गटाची ही भावनिक रणनीती कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ