वजन कमी करणे आणि फिट राहण्यासाठी डाएटचे विविध प्रकार; तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही डाएट फॉलो करणे टाळा
फिट राहणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे आजच्या जीवनशैलीत महत्त्वाचे बनले आहे. बहुतेक लोक जीम, योगा किंवा विविध डाएट्स करून हे साधतात. मात्र, कोणत्याही डाएटची सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आजकाल काही नवीन डाएट ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. उदाहरणार्थ, माईंडफूल इटींग मध्ये खाण्याच्या प्रत्येक क्षणावर पूर्ण लक्ष देणे आणि पदार्थाच्या चवीचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. हे अति खाणे टाळण्यास मदत करते.
पर्सनलाईज न्युट्रिशन डाएटमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजेनुसार आहार तयार केला जातो. यामध्ये सर्वांसाठी एकसारखा आहार नाही.
फ्लेक्सिटेरियन आणि रिड्यूक्टेरियन डाएट मध्ये मुख्यत्वे शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो, मात्र प्राण्यांचे उत्पादन काही प्रमाणात घेतले जाते.
फंक्शनल फूड्स डाएटमध्ये असे अन्न घेतले जाते ज्यात पोषणाशिवाय शरीराला अतिरिक्त बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स मिळतात.
सध्याचा ट्रेंड असलेला प्लांट बेस्ड डाएट फक्त वनस्पतींपासून मिळालेल्या अन्नावर आधारित आहे. यामध्ये फळे, भाज्या, धान्य, नट्स आणि सीड्स यांचा समावेश केला जातो. डाएटचे प्रकार कितीही ट्रेंडिंग असले तरी निरोगी शरीरासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योग्य आहार घेणे आवश्यक आहे.




