spot_img

Turmeric Water VS Turmeric Milk : हळदीचं दूध कि हळदीचं पाणी काय आहे सर्वात फायद्याचं ?

spot_img

हळद हा स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. असं म्हणतात हळदीत अनेक औषधी गुणधर्म असतात. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी (दाहक-विरोधी) गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, हळदीमुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. आणि पचनक्रिया सुधारते, शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि त्वचेसाठीही हळदीचा फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी हळदीचे पाणी (Turmeric Water ) घेतात. तर बर्याच जणांना रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध ( Turmeric Milk ) घेण्याची सवय असते. पण या दोन्हीपैकी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्यात एक चमचा हळद घालून ते पाणी पिल्यास फायदेशीर ठरते. याशिवाय यकृताच्या आरोग्यासाठीही हे पाणी उपायकारक आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास हे पाणी मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरीच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाणी पितात. परंतु दररोज किंवा जास्त प्रमाणात हे पाणी पिल्यास जळजळ, पित्ताचा त्रास होऊ शकतो.

हळदीच्या पाण्याबरोबरच हळदीच्या दुधाचे देखील बरेच फायदे आहेत. बहुतेक लोकं रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घेणे पसंत करतात. दूध गरम करून त्यात एक चमचा हळद घालून हे बनवले जाते. काही लोकं साखर देखील टाकतात. हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकलासारख्या आजारांवर हे दूध प्रभावी ठरते. या दुधामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. हे प्रथिने, कॅल्शियम आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. असं म्हणतात, हळदीच्या दुधात हळदीच्या पाण्यापेक्षा जास्त कॅलरीज असतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे सर्वात फायदेशीर ठरते. हे दूध पिल्याने रात्रीची झोप पण चांगली लागते.

त्यासोबतच हळदीचे पाणी हे शरीराला डिटॉक्सीफाय करते, यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय हळदीचे दूध हे संसर्गापासून शरीराचे संरक्षण करते. यामध्ये हळदीच्या पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असल्याने हे वजन कमी करण्यासाठी घेऊ नये. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात हळदीच्या दुधापेक्षा सकाळी एक ग्लास हळदीचे पाणी पिणे योग्य ठरते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ