spot_img

Trendy Haircuts : नवा लूक हवा आहे? ट्रेंडमध्ये असलेले हेअरकट्स नक्की ट्राय करा

spot_img

वेस्टर्न असो की एथनिक, योग्य हेअरकटमुळे वाढेल तुमच्या सौंदर्यात चार चांद

कोणताही आउटफिट परफेक्ट दिसण्यासाठी फक्त कपड्यांचीच नाही, तर योग्य हेअरस्टाईलचीही तितकीच गरज असते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक पोशाख, सुंदर हेअरकट संपूर्ण लूक उठावदार बनवतो. केसांचा आकार, घनता आणि चेहऱ्याचा प्रकार लक्षात घेऊन हेअरकट निवडला तर सौंदर्यात आपोआप भर पडते. सध्या महिलांमध्ये काही खास हेअरकट्स प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत, जे स्टायलिश तर आहेतच, शिवाय मेंटेन करायलाही सोपे आहेत.

लेयर कट (Layer Cut):

महिलांमध्ये कायमच लोकप्रिय असलेला लेयर कट केसांना नैसर्गिक व्हॉल्यूम देतो. लेयरमध्ये केस कापल्यामुळे केस हलके आणि भरदार दिसतात. सरळ तसेच कुरळ्या केसांवर हा कट छान शोभून दिसतो.

स्टेप कट (Step Cut):

वर्किंग वुमन आणि कॉलेज तरुणींमध्ये स्टेप कटची विशेष क्रेझ आहे. लांब केस असतील तर हा कट अधिक उठून दिसतो. केसांना स्टायलिश आणि स्मार्ट लूक देण्यासाठी स्टेप कट उत्तम पर्याय मानला जातो.

यू कट (U Cut):

U आकारात कापले जाणारे केस हा कट अधिक ट्रेंडी बनवतो. शॉर्ट असोत किंवा लांब केस, दोन्ही प्रकारांवर U कट आकर्षक दिसतो आणि केसांना सॉफ्ट फिनिश मिळते.

व्ही कट (V Cut):

U कटसारखाच पण अधिक शार्प लूक देणारा व्ही कट लांब आणि सरळ केसांवर खूपच सुंदर दिसतो. हा कट केसांना वेगळीच धार देतो.

बॉब कट (Bob Cut):

शॉर्ट हेअरस्टाईलमध्ये काहीतरी हटके हवं असेल तर बॉब कट नक्की ट्राय करा. हा कट मेंटेन करायला सोपा असून कमी वेळात रेडी होण्यासाठी उत्तम आहे.

फ्रंट हेअरकट (Front Hair Cut):

फ्रंट कटमध्ये कपाळावर केस येतील अशा पद्धतीने कापले जातात. केसांची लांबी कमी न करता लूकमध्ये बदल हवा असेल, तर हा कट परफेक्ट पर्याय आहे.

योग्य हेअरकट निवडून तुम्ही तुमचा लूक सहजपणे फ्रेश आणि ट्रेंडी बनवू शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ