2026 पर्यंत अनेक रोजगार बदलणार रूप, पण AI नव्या क्षेत्रांना देणार वेग
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI या तंत्रज्ञानाने सध्या जगभर चर्चेला चांगलाच उधाण आलं आहे. अनेक कर्मचारी “AI मुळे आपली नोकरी धोक्यात येईल का?” असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. तज्ज्ञ मात्र म्हणतात AI माणसाला पूर्णपणे पर्याय ठरणार नाही, पण काम करण्याची पद्धत नक्कीच बदलून टाकणार आहे.
2026 पर्यंत रोजगार क्षेत्रात मोठे बदल
पुढील काही वर्षांत विशेषत: 2026 पर्यंत, काही नोकऱ्या AI मुळे कमी होतील. विशेषतः नियमबद्ध, पुनरावृत्ती होणारी आणि एंट्री-लेव्हल कामे सर्वाधिक प्रभावित होतील. ग्राहक सेवा, डेटा एंट्री, कंटेंट एडिटिंग किंवा बॅक-ऑफिस यांसारख्या कामांकडे आता AI वेगाने वळत आहे.
IMF च्या अहवालानुसार, जगभरातील सुमारे 300 दशलक्ष नोकऱ्यांवर AI चा थेट परिणाम होऊ शकतो. यातील 25% कामे पूर्णपणे ऑटोमेशनकडे झुकतील. अमेरिकेतही जवळपास 7% कर्मचाऱ्यांना याचा तात्पुरता फटका बसणार आहे.
जाणाऱ्या नोकऱ्या आणि निर्माण होणाऱ्या नवीन भूमिका
WEF च्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत 92 दशलक्ष पारंपरिक नोकऱ्या संपतील; परंतु त्याच वेळी AI-आधारित 170 दशलक्ष नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. म्हणजेच एकूण 78 दशलक्ष ताज्या रोजगार संधी निर्माण होतील.
भारतामधील IT उद्योगातील तज्ज्ञ BV Reddy यांच्या मते, 2026-27 पासून AIशी संबंधित नवीन तांत्रिक भूमिकांची मागणी प्रचंड वाढेल. नियमांवर आधारित आणि रिपीटिव्ह कामे मात्र संकटात येऊ शकतात.
कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका?
- AI त्या नोकऱ्या झपाट्याने घेत आहे जिथे मानवी कल्पकता किंवा भावनिक समज गरजेची नाही
- ग्राहक सेवा प्रतिनिधी (AI चॅटबॉट्स जलद उत्तर देतात)
- बेसिक कंटेंट रायटिंग आणि एडिटिंग
- लीगल असिस्टंट, डॉक्युमेंट रिव्ह्यू, डेटा विश्लेषण
- ऑफिस प्रशासन व बॅक-ऑफिस ऑपरेशन्स
कोणत्या नोकऱ्या सुरक्षित?
1) मानवी भावना, नैतिकता आणि सूक्ष्म निर्णय AI ला अजूनही समजत नाहीत. त्यामुळे काही नोकऱ्यांवर मोठा परिणाम होणार नाही:
2) सामाजिक कार्य, शिक्षण, मानसोपचार, आरोग्यसेवा
3) सर्जनशील क्षेत्रे—जाहिरात, लेखन, कला, फिल्म
4) AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंगसारखे तांत्रिक क्षेत्र
5) नेतृत्व व व्यवस्थापन, जिथे मानवी निर्णय महत्त्वाचे ठरतात




