spot_img

Travel Outfits For Women : प्रवासात स्टाइलसोबत आरामही! महिलांसाठी परफेक्ट ट्रॅव्हल आऊटफिट आयडिया

spot_img

लांब किंवा शॉर्ट ट्रिप असो, योग्य कपड्यांमुळे प्रवास होतो अधिक सुखकर आणि स्टायलिश

आजकाल अनेक महिलांसाठी ट्रॅव्हलिंग म्हणजे केवळ गरज नाही, तर एक आवड आणि अनुभव असतो. प्रवासात सतत बसणे, चालणे किंवा हवामान बदल यामुळे कपड्यांची निवड फार महत्त्वाची ठरते. योग्य आणि आरामदायी आऊटफिटमुळे प्रवास अधिक एन्जॉय करता येतो. म्हणूनच ट्रॅव्हल करताना स्टाइलपेक्षा कम्फर्टला प्राधान्य देणं गरजेचं आहे. महिलांसाठी काही ट्रेंडी आणि कम्फर्टेबल ट्रॅव्हल आऊटफिट्स पुढीलप्रमाणे…

लूज-फिट जीन्स

प्रवासासाठी ट्रॅक पॅन्ट किंवा लोअर्सपेक्षा लूज-फिट जीन्स हा उत्तम पर्याय ठरतो. टॉप किंवा कुर्तीसोबत जीन्स सहज स्टाईल करता येते. बॅगी जीन्स सध्या ट्रेंडमध्ये असून लांब प्रवासातही त्या आरामदायी वाटतात. शिवाय फोटो काढतानाही लूक मस्त दिसतो.

जंपसूट

जंपसूट्स पुन्हा फॅशनमध्ये आले आहेत. शॉर्ट ट्रिपसाठी ते खूपच सोयीचे आणि स्टायलिश असतात. मात्र, लांब प्रवासासाठी जंपसूट टाळलेला बरा. स्ट्रॅपी जंपसूट टी-शर्टसोबत घातल्यास लूक अधिक कॅज्युअल दिसतो.

ओव्हरसाईज्ड टी-शर्ट

हलके आणि सैल कपडे प्रवासासाठी परफेक्ट मानले जातात. जीन्ससोबत ओव्हरसाईज्ड टी-शर्ट घातल्यास कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही मिळतात. थंड ठिकाणी जात असाल तर त्यावर डेनिम जॅकेट कॅरी करायला विसरू नका.

कफ्तान ड्रेस


बीच डेस्टिनेशनसाठी कफ्तान ड्रेस हा बेस्ट चॉईस आहे. सैल-फिटिंग असल्यामुळे ते खूपच आरामदायी असतात आणि लूकलाही वेगळं आकर्षण मिळतं. कफ्तानसोबत जीन्स घालूनही स्टायलिश लूक करता येतो.

शॉर्ट्स आणि टी-शर्ट

रोड ट्रिपसाठी शॉर्ट्स आणि टी-शर्ट ही क्लासिक कॉम्बिनेशन आहे. हलका टी-शर्ट, आरामदायी शॉर्ट्स आणि कॅनव्हास शूज यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो. ओव्हरसाईज टी-शर्टसोबत शॉर्ट्स ट्रेंडीही दिसतात.

लॉन्ग स्कर्ट

उष्ण ठिकाणी प्रवास करताना कॉटन कपडे घालणं फायद्याचं ठरतं. लॉन्ग स्कर्टमुळे पायांचे टॅनिंग कमी होते. फुल-स्लीव्ह क्रॉप टॉप किंवा टी-शर्टसोबत लॉन्ग स्कर्ट घालून तुम्ही कम्फर्टेबल आणि एलिगंट लूक मिळवू शकता.

योग्य आऊटफिट निवडल्यास प्रवास केवळ आरामदायीच नाही तर स्टायलिशही होतो. त्यामुळे पुढच्या ट्रिपसाठी कपड्यांची निवड करताना हे पर्याय नक्की लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ