तुळशीच्या लग्नानंतर सुरु लग्नसराईचा (Wedding)मोसम सुरु होतो. विविध समाजात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडत असतो. लग्नात लोक डेकॉरेशन, वधूवरचा लुक त्यानंतर फोटो,विडिओ यासर्व गोष्टीवर बक्कळ पैसे लुटवतात. याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे ज्यावर लोक दिलखुलास पैसे देतात ते म्हणजे लग्नाचं जेवण. लग्नाचं जेवण हे उत्कृष्ट असायला हवे. प्रत्येकाला त्यांच्या पोशाखांना आणि जेवणाला पारंपारिक स्पर्श द्यायचा असतो ज्यामुळे लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उत्तम पद्धतीने करता येईल आणि नंतर ते लग्नाच्या जेवणाचे कौतुक करतील. मात्र तुम्हाला माहित आहे का? भारतात लग्नसमारंभासाठी हे पदार्थ असणं अत्यंत महत्वाचं मानलं जात. किंबहुना ते पदार्थ लग्नसमारंभात असायलाच हवे. जाणून घ्या ते पदार्थ कोणते आहेत.
बिर्याणी (Biryani)
सर्वात आधी येते ती बिर्याणी! बिर्याणी हे अनेकांचं फेव्हरेट फूड मानलं जातं. त्यामुळे बिर्याणी ही लग्नाच्या मेन्यूत सर्वात जास्त पसंत केली जाणारी डिश आहे. हैदराबादी, लखनऊ बिर्याणी ही दक्षिण भारतीय लग्नांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
बटर चिकन (Butter Chiken)
दिल्ली आणि पंजाबमध्ये बटर चिकनला नेहमीच लग्नाच्या मेन्यूत विशेष स्थान दिले जाते. उत्तर भारतीय लग्नांमध्ये ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे आणि लग्नात पाहुणे नान किंवा रोटीसोबत हे खाण्यास पसंत करतात.
पनीर टिक्का (Paneer Tikka)
जर तुम्ही शाकाहारी आहात तर शाकाहारी पाहुण्यांसाठी हे एक उत्तम स्टार्टर असून पंजाब आणि दिल्लीतील लग्नांमध्ये ही डिश सामान्य आहे. राजस्थान, गुजरातमधील लग्नांमध्येही या डिशला पसंती असते.
मलई कोफ्ता (Malai Kofta)
रतात मलाई कोफ्ता खाल्ला जातो. त्याबरोबरच मुघलाई पाककृतीशी ही डिश संबंधित असून हिवाळ्यात लग्नात ही डिश मेन्यूत लोकप्रिय असते.
तंदुरी चिकन (Tandoori Chiken)
तंदुरी चिकन हि लग्नात सर्वांची आवडती डिश ठरते. पंजाब व उत्तर भारतीय लग्नांच्या मेन्यूमध्ये या डिशचा समावेश असतो. त्याबरोबरच गोवा आणि महाराष्ट्रातील लग्नांमध्येही तंदुरी चिकन ही डिश असते.
दाल मखनी (Daal Makhani)
दाल मखनी हा जवळपास सर्वच लोकांना आवडणारा पदार्थ आहे. नान, तंदुरी रोटी किंवा जीरा राईससोबत यासोबत ही डाळ खायला सर्वांना आवडते.




