नवी मुंबई : विजय गायकवाड
नवी मुंबई पालिकेवर (NMMC) भाजपचा झेंडा फडकणार असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश सोहळा व जनसंपर्क कार्यालय व निवडणूक कार्यालयाच्या उदघाट्न सोहळ्यावेळी उपस्थीतासमोर केले. यावेळी मंत्री गणेश नाईक आपल्या भाषणात म्हणाले की,”नवी मुंबईतील FSI ठाण्यातील लोकांनी पळवला आहे. त्यांनी पालिकेच्या ठेवीवर डल्ला मारला आहे.आपल्या ठेवी फक्त 3 हजार करोड रुपयांवर आणून ठेवल्यात याला ठाणेकर जबाबदार आहेत. मी शब्द दिला होता की, 20 वर्षात पाणी पट्टी व टॅक्स वाढणार नाही वाढला का? नाही मग आता मी तुम्हांला शब्द देतो की, आता पुढील 25 वर्ष पाणी व टॅक्स बिल वाढणार नाही.कै.आर.आर.पाटील असताना त्यांना मी नवी मुंबईतील पाण्याची समस्या मांडली असताना त्यांनी मला सांगितले की तुम्ही मोरबे धरण विकत घ्या तेव्हा डॉ.संजीव नाईक महापौर होते. त्यावेळी पालिकेने कर्ज घेऊन ते धरण विकत घेतल्यामुळे आज नवी मुंबईतील महिलांचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.”
पुढे बोलताना मंत्री गणेश नाईक म्हणाले की “नवी मुंबईतील झोपडपट्टी मधील लोकांना चांगल्या प्रकारची घरे ते सुद्धा मोफत देणार. त्यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून घेऊन त्यावर टॉवर बांधून ती घरे उपलब्ध करून देणार ज्याचे घर 400 फुटाचे आहे. त्याला 600 फुटाचे घर देणार, येथील फेरीवाले, भिकारी, तृतीय पंथी यांचा देखील विचार केला जाणार त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. यामुळे आपल्याला विकास करायचा असेल तर आपण प्रभाग क्र. 7 मधून निवडणुकीस उभे असलेले 4 उमेदवार हरीशचंद्र भीमराव वाघमारे,रंजना मनोहर पाटील, मोनिका लक्ष्मीकांत पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांना कमळ चिन्ह दाबून निवडून द्यायचे आहे. त्याच प्रमाणे गणेश म्हात्रे देर आये लेकिन दुरुस्त आये त्यांनी चांगला निर्णय घेतला त्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्याचे स्वागतच आहे. गणेश म्हात्रे, रश्मी गणेश म्हात्रे, पियुष म्हात्रे, नीरज चवन्डे, विलास कांबळे, मंदा मोहिते, सुप्रिया गुजर, रिद्धी पाटील, व शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला.




