ठरलं तर मग (Tharla tar Mag) ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील पात्रं, त्यांचा संवाद आणि भावना प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे . ठरलं तर मग (Tharla tar Mag) काही दिवसांपूर्वी ठरलं तर मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या निधन झाले. ज्यमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने केवळ मालिकेच्या टीमलाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ वाटली. मात्र, आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पूर्णा आजी परत अली आहे आणि पुन्हा मालिकेत दिसणार आहे! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी (Rohini Hattangadi) ही भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या आगमनाने संपूर्ण टीममध्ये उत्साह आला आहे.
रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग मालिका हि माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. त्या या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. ज्योती चांदेकर ज्या पूर्णा आजीची भूमिका साकारायच्या त्यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल. आता तिची भूमिका मी साकारणार आहे. कसं असतं कलाकाराने त्याची भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं म्हणजे थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे मला या भूमिकेत स्वीकारावं ही इच्छा आहे.’ ठरलं तर मग या मालिकेतील रोहिणीं हट्टंगडी म्हणजेच पूर्नाजीची भूमिका चाहत्यांना कशी वाटते हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.




