spot_img

Thane Crime News : अंबरनाथमध्ये पोलिसांचा नाशिक पॅटर्न! गुन्हेगारांची काढली धिंड

spot_img

‘ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशी गुन्हेगारांकडून घोषणा देवून घेत पोलिसांची कठोर मोहीम.

अंबरनाथमध्ये (Ambernath) वाढत्या गुन्हेगारीला ठोसा देत पोलिसांनी अशी कारवाई केली की शहर अक्षरशः थरारून गेलं. नाशिकसारख्या कडक पद्धतीचा अवलंब करत अंबरनाथ पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांची धिंड काढून कायद्याची दणकट ताकद रस्त्यावर उतरवली. “ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशी घोषणा गुन्हेगारांकडून देवून घेताना पोलिसांनी गुन्हेगारीला “या जिल्ह्यात गुन्हा करणार तर रस्त्यावर इज्जत काढली जाईल!” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी अचानक वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने एका दिवसात तिन्ही व्यक्तींवर धरपकड न करता थेट प्राणघातक हल्ले करून शहरात दहशत पसरवली. या घटनांनी पोलिसांसमोर गुन्हेगारीवर अंकुश आणण्याचे मोठे आव्हान उभे केले. ही दहशत रोखण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी ‘नाशिक पॅटर्न’ (Nashik Pattern) वर आधारित कडक आणि धडाकेबाज मोहीम राबवली. प्राणघातक हल्ल्यांतील आरोपींना पोलिसांनी शहरातून जाहीरपणे फिरवत त्यांची धिंड काढली. कडक पोलिस बंदोबस्तात आरोपींच्या हातात फलक देण्यात आले, तर नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडून “ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला!” ही घोषणा जोरात वदवून घेतली. या उपक्रमाने शहरात मोठी चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये सुरू झालेली धिंड कारवाई आता ठाणे जिल्ह्यात पसरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. कायदा-सुव्यवस्थेला बळकट करण्यासाठी पोलिसांनी राबविलेला हा कठोर पॅटर्न गुन्हेगारांना थेट इशारा समजला जात आहे. नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत शहरात पुन्हा सुरक्षिततेची भावना बळकट होत असल्याचे सांगितले. अंबरनाथ पोलिसांनी दाखवलेला हा कणखर दणका आता जिल्हाभर गुन्हेगारी विरोधात नव्या अध्यायाची सुरूवात ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ