spot_img

Thalapathy Vijays Emotional Goodbye to Cinema : थलपती विजयचा सिनेसृष्टीला निरोप; ‘जन नायकन’ ठरणार अखेरचा चित्रपट

spot_img

मलेशियातील भव्य कार्यक्रमात मोठी घोषणा; आता संपूर्ण वेळ राजकारणासाठी देणार

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपती यांचा चाहतावर्ग केवळ भारतातच नाही, तर जगभरात पसरलेला आहे. त्यांच्या एका झलकसाठीही हजारोंची गर्दी होते. अभिनयासोबतच आता विजय थलपती यांनी राजकीय मैदानातही ठाम पाऊल टाकले असून त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये पक्षाचा झेंडा आणि चिन्ह अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, विजय थलपती यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच प्रदर्शित होणारा ‘जन नायकन’ हा चित्रपट त्यांच्या सिनेकारकिर्दीतील शेवटचा ठरणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम मलेशियात मोठ्या दिमाखात पार पडला. याच कार्यक्रमात त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा करण्याची घोषणा केली.

‘जन नायकन’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी विजय थलपती क्वालालंपुरला गेले होते. बुकिट जलील स्टेडियममध्ये २७ डिसेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल एक लाखांहून अधिक चाहते उपस्थित होते. मलेशियात तामिळ लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.

यावेळी भावूक होत विजय थलपती म्हणाले, “मी जेव्हा सिनेसृष्टीत आलो, तेव्हा वाटले की मी एक छोटा वाळूचा किल्ला उभारत आहे. पण तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासाठी राजवाडा उभा केला. चाहत्यांनी मला घडवले. त्यामुळेच आता मी त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी सिनेमा सोडत आहे.”

मलेशियन चाहत्यांचे आभार मानताना त्यांनी प्रेरणादायी संदेशही दिला. “यश मिळवण्यासाठी मित्रांपेक्षा एक मजबूत प्रतिस्पर्धी अधिक महत्त्वाचा असतो. तोच तुम्हाला अधिक सक्षम बनवतो. २०२६ साठी स्वतःला तयार ठेवा,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ‘थलपथी थिरूविझा’ नावाने ओळखल्या गेलेल्या या सोहळ्यातून विजय थलपती यांनी राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी चित्रपटसृष्टीला भावनिक निरोप दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ