spot_img

Thalapathy vijay : घटस्फोटाच्या अर्जानंतर थलपती विजय आणि तृषा कृष्णन पहिल्यांदाच एकत्र

spot_img

पत्नी संगीताने केले होते गंभीर आरोप; चेन्नईतील शाही रिसेप्शनमधील व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या व्यावसायिक यशापेक्षा खाजगी आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आला आहे. विजयची पत्नी संगीता सोरनलिंगम हिने २४ फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, त्यामध्ये विजयवर एका अभिनेत्रीसोबत ‘विवाहबाह्य संबंध’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर, नुकत्याच चेन्नईत पार पडलेल्या ‘एजीएस’ चित्रपटाचे निर्माते कलपथी सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी एकत्र हजेरी लावली. या सोहळ्यात दोघेही पारंपरिक बेज रंगाच्या पेहरावात जोडीने पोहोचल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंचावर नवदांपत्याला शुभेच्छा देताना आणि फोटो क्लिक करताना विजय आणि तृषा एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विजयवर टीकेचा वर्षाव सुरू केला आहे. “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू आमचा विश्वास तोडलास,” अशा संतप्त प्रतिक्रिया चाहते देत आहेत. विशेष म्हणजे, संगीताने आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की, ज्या अभिनेत्रीसोबत विजयचे संबंध आहेत, ती सतत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आपला आणि मुलांचा अपमान करत होती. या वादाचा परिणाम विजयच्या मुलावरही झाल्याचे दिसत असून, मुलगा जेसन संजय याने इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांना अनफॉलो केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विजय आणि संगीता वेगळे राहत असून, कौटुंबिक स्वातंत्र्यावर आणि आर्थिक बाबींवर मर्यादा आणल्याचा आरोपही संगीताने केला आहे. सध्याच्या या ‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर’च्या चर्चांमुळे थलपती विजयच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ