spot_img

Test XI of 2025 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बेस्ट टेस्ट टीम 2025मध्ये 3 भारतीयांची नावे

spot_img

भारताचे एकूण चार जण या बेस्ट टेस्ट टीममध्ये आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 मधील टेस्ट क्रिकेटमधल्या बेस्ट खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्यांनी टेस्ट टीममध्ये आपल्याच देशाच्या पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांना स्थान दिलेलं नाही. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचे मजबूत आधारस्तंभ आहेत. पॅट कमिन्स कॅप्टन आहे. स्टीव्ह स्मिथ दमदार फलंदाज आहे. वर्ष 2025 मध्ये संघाला गरज असताना स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सुद्धा संभाळली. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 च्या टेस्ट टीममधून कमिन्स आणि स्मिथ दोघांना बाहेर केलय.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्ष 2025 च्या टेस्टच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारे सर्वाधिक खेळाडू ऑस्ट्रेलियाचेच आहेत. पण यात कमिन्स आणि स्मिथ नाहीय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकूण त्यांच्या 4 खेळाडूंना 2025 च्या बेस्ट टेस्ट इलेव्हनमध्ये निवडलय. यात मिचेल स्टार्क, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी आणि स्कॉट बोलँड सारखे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 3 भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडलय. भारताकडून केएल राहुल, शुबमन गिल आणि जसप्रती बुमराह यांची निवड केली आहे. त्याशिवाय रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) टीममधील 12 वा खेळाडू बनवलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ