Terrorist Shabbir Ahmed Lone Arrested : दिल्लीत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक; पोलिसांनी मोठ्या हल्ल्याची योजना हाणून पाडली

spot_img

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. तो मेट्रो पोस्टर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा थेट संपर्क असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक चौकशीत असे उघड झाले की, लोन हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने भारतात लष्कर-ए-तोयबाचे नवीन नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करत होता. गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली सीमेवर त्याला पकडण्यात आले. तो बांगलादेशातून कार्यरत राहून भारतात हल्ल्यांचे नियोजन करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या गटाने दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत विविध ठिकाणी भारतविरोधी पोस्टर्स लावल्याचे समोर आले आहे. या पोस्टर्समध्ये बुरहान वानीचे उदात्तीकरण करण्यात आले होते तसेच काश्मीर संदर्भात भडक घोषणाही करण्यात आल्या होत्या.तपासात असेही समोर आले की, या नेटवर्कने बनावट ओळखपत्रांचा वापर करून भारतात राहण्याची सोय केली होती आणि एनक्रिप्टेड अ‍ॅप्सद्वारे संवाद साधला जात होता. दिल्लीसह इतर शहरांमध्ये टेहळणीही करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, शब्बीर अहमद लोनला यापूर्वी 2007 मध्येही दिल्ली पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली होती. त्यानंतर जामिनावर सुटल्यावर तो बांगलादेशात पळून गेला आणि तेथून पुन्हा दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. तपास यंत्रणांच्या मते, या मॉड्यूलचा उद्देश भारतात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा होता. लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, वेळेत केलेल्या कारवाईमुळे हा गंभीर कट उधळण्यात यश आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ