spot_img

Tejaswini Lonari Mehandi Ceremony : तेजस्विनी लोणारीच्या हातावर रंगली नेत्याच्या नावाची मेहंदी; PHOTO झाले व्हायरल

spot_img

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्न करणार आहे.

तेजस्विनी लोणारीच्या हातावर समाधन सरवणकरांच्या नावाची मेहंदी रचलीय. तेजस्विनीच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी ती लग्न करणार आहे. तेजस्विनीच्या हातावर समाधान यांच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनीनं ऑक्टोबर महिन्यात समाधान यांच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमात तेजस्विनीचा अत्यंत साधा आणि तितकाच आकर्षक लूक पहायला मिळाला. तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या हात आणि पायांवर सुरेख मेहंदी काढण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ