spot_img

Tejaswini Lonari Engagement Samadhan Sarvankar : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने उरकला गुपचूप साखरपुडा, समाधान सरवणकर कोण आहे?

spot_img

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिने नुकताच साखरपुडा केला असल्याची बाब समोर अली आहे. त्यासोबत तिच्या साखरपुड्याची काही खास फोटो पुढे आली आहेत. अभिनेत्रीने कोणासोबत साखरपुडा केला हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने चाहत्यांना गोड बातमी देत तिचा साखरपुडा झाल्याची बाब कळावली आहे. विशेष म्हणजे या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदा सरवणकर (Samadhan Sarvankar)यांचा मुलगा समाधान सरवणकर याच्यासोबत साखरपुडा केला,जो शिवसेनेचा युवानेता आहे. तेजस्विनी लोणारी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त बघायला मिळते. चाहते अभिनेत्रीला साखरड्याबद्दल शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न केल्यास ती अनेकदा भाष्य करणे टाळते. आता थेट राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यासोबतच तिने लग्न केले. सरवणकर कुटुंबियांची सून तेजस्विनी लोणारी होणार आहे.

सदा सरवणकर तीन वेळा आमदार झाले. मात्र, यंदाच्या वेळी त्यांना निवडणुकीत पराभवाचा स्वीकार करावा लागला. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे त्यांच्या बाविरोधात होते. सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंची लढत झाल्याने थेट सदा सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिंदेच्या शिवसेना गटाच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या या समाधान सरवणकर यांच्यावर आहेत. समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक म्हणून उभे होते. आता सध्या ते शिवाजी पार्क जिमखान्याचे उपाध्यक्ष आहेत. अचानक समाधान सरवणकर यांनी अचानक पार पडलेल्या या साखरपुड्यामुळे कमी लोकांची उपस्थिती राहिली होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ