spot_img

Tandulja Bhaji Recipe : ‘अशी’ बनवा बाराही महिने मिळणारी पौष्टिक तांदुळजा भाजी

spot_img

आयुर्वेदाने तांदुळजा या भाजीला आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठ मानली असून एकदा तरी ही पालेभाजी नक्की खाल्ली गेली पाहिजे. तांदुळजा ही बाराही महिने मिळणारी पालेभाजी आहे. तिच्यात पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. तांदुळजा ही भाजी झटपट कशी बनवायची हे आपण समजून घेऊ.

तांदुळजा (Amaranthus spinosus) भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य –
तांदुळजा भाजी, तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लसूण, हिंग, शेंगदाणे, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.

सुरुवातीला तांदळीची भाजी नीट निवडून घ्यावी. त्यानंतर ती 2–3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी, जेणेकरून माती किंवा घाण पूर्णपणे निघून जाईल. धुतलेली भाजी चाळणीत ठेवून अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळू द्यावे. कढईत आवश्यकतेनुसार तेल घालून ते गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकून ती तडतडू द्यावी. त्यानंतर जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घालून फोडणी द्यावी. यानंतर तांदळीची भाजी कढईत घालावी आणि मध्यम आचेवर परतायला सुरुवात करावी. सुरुवातीला भाजीचे प्रमाण जास्त दिसेल, मात्र परतताना वाफ निघत गेल्याने तिचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. भाजी साधारण निम्म्यावर आली की चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट मिसळा. भाजी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यावी. तयार झालेली तांदळीची भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, खाण्यास अतिशय चविष्ट लागते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ